Ladki Bahin Yojana Scheme 2025 : राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांसाठी सुरू केलेल्या “लाडकी बहीण योजने” अंतर्गत, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबांतील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून, आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7 हफ्ते जमा झाले आहेत. मात्र, फेब्रुवारी 2025 चा हफ्ता अद्याप जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता पसरली होती.
डबल गिफ्ट मिळणार: फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्र पैसे!
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलासा दिला आहे. 7 मार्च 2025 पर्यंत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे सांगितले की, “महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा सन्मान निधी मिळेल.”
2100 रुपये कधीपासून मिळणार?
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबतचा अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाण्याची शक्यता आहे. निर्णय झाल्यास महिलांना लवकरच वाढीव रक्कम मिळू शकते.
ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे येत्या काळात वाढीव मदत कधीपासून मिळेल याकडे महिलांचे लक्ष आहे!