LPG Gas Rete news 2025 : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४१ रुपयांची घट करण्यात आली असून, हे नवे दर १ एप्रिलपासून लागू झाले आहेत.
दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांतील नवे दर
- दिल्ली: आता १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १७६२ रुपये
- कोलकाता: नवीन किंमत १८७२ रुपये (पूर्वी १९१३ रुपये)
- मुंबई: नवीन किंमत १७१४.५० रुपये (पूर्वी १७५५.५० रुपये)
- चेन्नई: नवीन किंमत १९२४ रुपये (पूर्वी १९६५ रुपये)
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात झाली असली, तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या घरगुती १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर खालील दराने उपलब्ध आहे:
- दिल्ली: ८०३ रुपये
- कोलकाता: ८२९ रुपये
- मुंबई: ८०२.५० रुपये
- चेन्नई: ८१८.५० रुपये
व्यावसायिक गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना यामुळे थोडा दिलासा मिळेल, तर घरगुती ग्राहकांना अद्याप सवलतीची प्रतीक्षा करावी लागेल.