फक्त ५० रुपयांत बनवला स्वस्तात मस्त AC – टेबल फॅनपासून गर्मीवर जबरदस्त जुगाड!

Desi jugad video : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे अनेकजण घरातच थांबणं पसंत करत आहेत. मात्र काहीवेळा गरजेच्या कामांसाठी बाहेर जाणं अनिवार्य होतं.

अशा वेळी लोकं उन्हापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधत असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

भारतीय माणूस ‘जुगाड’ करण्यात पारंगत असतो, हे वेगळं सांगायला नको. आपल्या देशात काहीही वाया जात नाही, त्याचा काहीतरी उपयोग केला जातोच. अनेक वेळा हे जुगाड इतके प्रभावी असतात की मोठमोठे तज्ज्ञही थक्क होतात.

सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एका तरुणाने अवघ्या ५० रुपयांत टेबल फॅनपासून एसीसारखी थंड हवा देणारी यंत्रणा तयार केली आहे. या ‘जुगाडू एसी’मुळे उन्हातही थंडावा अनुभवता येतो.

या व्हिडीओमध्ये दाखवलेला प्रयोग केवळ स्वस्त नाही तर परिणामकारकही आहे. विशेष म्हणजे, हा प्रयोग करताना वापरलेले साहित्य सहजपणे उपलब्ध होणारे आहे आणि त्यासाठी मोठ्या खर्चाची गरज नाही.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सदर व्हिडीओ ‘muthuranji’ या इन्स्टाग्राम खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. कोणी म्हणतोय, “एकदम भन्नाट कल्पना”, तर कोणी म्हणालं, “हे फक्त भारतीयच करू शकतात!”

जसे तापमान वाढतेय, तसे असे हटके जुगाड पुढे येत राहतील हे नक्की. आणि सोशल मीडियावर अशा व्हिडीओंना नेहमीच मोठा प्रतिसाद मिळत राहील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment