बैलाची स्कुटर चालवताना दुर्मिळ दृश्य, CCTV कॅमेरात कैद; इंटरनेटवर व्हायरल हशेचा पूर! Video Viral

Bull viral video 2025 : सध्या सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर आणि अनोखा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील दृश्ये इतकी अजब आहेत की ती पाहणाऱ्यांना प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही. यामध्ये एक भटका बैल रस्त्यावर पार्क केलेली स्कूटर “चालवताना” दिसतो – हो, हे खरंच आहे!

ही घटना उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये दिसते की एक बैल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूटरकडे जातो. काहीशा विचित्र हालचालींमुळे तो स्कूटरवर चढतो आणि स्कूटरमध्ये अडकतो. त्यामुळे ती स्कूटर पुढे ओढली जाते आणि क्षणभर तरी वाटते की जणू बैलच ती स्कूटर चालवत आहे.

हा मजेशीर प्रकार पाहून नेटिझन्सनी हसू आवरणे कठीण झाले असून, व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काही अंतरापर्यंत बैल स्कूटरला ओढत नेतो, पण शेवटी स्कूटर असंतुलित होऊन खाली पडते आणि बैलही त्याच क्षणी तिथून पळ काढतो.

सामान्यतः स्कूटर किंवा बाइक चोरीची प्रकरणं आपण अनेक वेळा ऐकतो, पण स्कूटरवर बैल “स्वार” झाल्याची ही घटना नेटकऱ्यांसाठी पूर्णतः नवी आणि गमतीशीर ठरली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे आणि सगळीकडे त्याचीच चर्चा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment