न्यायदंडाधिकारी कार्यालयमध्ये रिक्त जागांची भरती : 4थी / 7वी /10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती | वेतन – 15,000 ते 47,600 रूपये.

CMM Mumbai Recruitment 2025 : मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आस्थापनेवर सफाईगार / मेहतर पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांची निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार केली जाणार आहे. ज्या उमेदवारांची पात्रता दिनांक 16 मार्च 2025 रोजी निकषांनुसार ठरते, त्यांनी 17 मार्च 2025 ते 01 एप्रिल 2025 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

भरती विभाग – मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार.
भरती प्रकार – सरकारी नोकरी मिळवण्याची संधी.
भरती श्रेणी – महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनंतर जाहीर केलेली भरती.

पदाचे तपशील:

  • पदाचे नाव – सफाईगार / मेहतर
  • शैक्षणिक पात्रता – किमान चौथी उत्तीर्ण आवश्यक. उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार (7वी/10वी/12वी/पदवीधर) अर्ज करू शकतात. (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा18 ते 38 वर्षे (सरकारच्या नियमानुसार शिथिलता लागू).
  • मासिक वेतन₹15,000 ते ₹47,600.
  • नोकरीचे ठिकाणमुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, एस्प्लनेड, मुंबई.
  • नोकरीचा प्रकारकायमस्वरूपी (Permanent) सरकारी नोकरी.
  • एकूण पदसंख्या07 जागा.

निवड प्रक्रिया:

  1. चापल्य व साफसफाई मूल्यमापन परीक्षा – 20 गुणांची परीक्षा घेतली जाईल.
  2. गुणवत्तेनुसार मुलाखत – परीक्षेतील गुणांच्या आधारे, जाहिरातीनुसार पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

कामाचे स्वरूप:

  1. न्यायालयीन इमारतीची, परिसराची व शौचालयांची स्वच्छता व निगा राखणे.
  2. मुख्य न्यायाधीश व इतर अधिकारी यांच्या निर्देशानुसार कामे पार पाडणे.

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज पद्धतफक्त ऑफलाइन, नोंदणीकृत डाक (RPAD) किंवा स्पीड पोस्ट (Speed Post) द्वारा अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता
    मा. प्रबंधक, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, महापालिका मार्ग, एस्प्लनेड, मुंबई – 400001.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख01 एप्रिल 2025, संध्याकाळी 5:30 पर्यंत.
  • उशिरा आलेले किंवा अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

महत्वाची सूचना:

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑफलाइन अर्ज व्यतिरिक्त कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

What's app group