शेतकऱ्यांना मिळणार ४८९ कोटी विमा भरपाई; बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मंजूर! जिल्हा निहाय यादी पहा

Crop Insurance New District List News : खरिप २०२४ च्या हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईचे वितरण सुरू झाले आहे. यामध्ये विशेषतः विदर्भातील ९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ४८९ कोटी ६१ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे.

या भरपाईमध्ये विविध प्रकारच्या ट्रिगरखाली मंजूर झालेल्या नुकसानीचा समावेश आहे. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगांच्या आधारे निश्चित झालेल्या भरपाईचा समावेश आहे.

बुलडाणा जिल्हा हा सर्वाधिक भरपाई मिळवणारा जिल्हा ठरला आहे, तर भंडारा जिल्हा सर्वात कमी भरपाई प्राप्त करणारा आहे. चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांतील भरपाई अद्याप निश्चित झालेली नाही.

राज्यभरातील शेतकऱ्यांना एकूण २,३०८ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

विदर्भातील जिल्ह्यानिहाय भरपाईचा तपशील:

बुलडाणा

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती – १४४ कोटी २१ लाख
  • पीक कापणी प्रयोग – २ लाख
  • एकूण भरपाई – १४४ कोटी २३ लाख

अमरावती

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ५० कोटी ९ लाख
  • काढणी पश्चात भरपाई – १० कोटी ५१ लाख
  • पीक कापणी प्रयोग – १९ लाख
  • एकूण भरपाई – ६० कोटी ८० लाख

अकोला

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ६६ कोटी ६४ लाख

वाशीम

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती – १० कोटी ७४ लाख

यवतमाळ

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ६ कोटी ८६ लाख
  • काढणी पश्चात भरपाई – २२ कोटी ९५ लाख
  • एकूण भरपाई – २९ कोटी ८१ लाख

वर्धा

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ११५ कोटी १८ लाख
  • काढणी पश्चात भरपाई – ७१ लाख
  • एकूण भरपाई – ११५ कोटी ९० लाख

ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार असून, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी ही मोठी आर्थिक मदत ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment