लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या खात्यात पैसे येण्याची तारीख!

Ladki Bahin Yojana April Month Installment 2025 : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री “लाडकी बहीण योजना”वर सध्या अनेक चर्चाएं होत आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला एक निश्चित रक्कम दिली जाते. सध्या महिलांमध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या दिवशी, म्हणजे ८ मार्च रोजी दिला गेला होता. यामुळे, एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या सणाच्या मुहूर्तावर, ६ एप्रिल २०२५च्या आसपास महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. कदाचित, ६ ते १० एप्रिलदरम्यान १५०० रुपये महिलांच्या खात्यात येऊ शकतात, हे सांगितले जात आहे.

मात्र, या योजनेमध्ये काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यातील ५ लाख महिलांना जानेवारी महिन्यात आणि ४ लाख महिलांना फेब्रुवारी महिन्यात अपात्र घोषित करण्यात आले आहे. मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र ठरवले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एकूण ५० लाख महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकतात, असे सांगितले जाते. त्यांमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना या महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

What's app group