Mahila Balvikas Vibhag Recruitment 2025 : महिला व बाल विकास विभाग आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी मदतनीस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ही १२ वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे.
भरती करणारी संस्था: महिला व बालविकास विभाग, तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
अर्ज सादर करण्याचा कालावधी:
दिनांक: 17 एप्रिल 2025
शेवटची तारीख: 02 मे 2025
शैक्षणिक अर्हता:
- अर्जदाराने मान्यताप्राप्त राज्य मंडळ किंवा तत्सम संस्थेमार्फत १२ वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- जास्त शैक्षणिक पात्रता असल्यास, त्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक अटी:
- स्थानीयता: उमेदवाराचे वास्तव्य त्या अंगणवाडी केंद्राच्या हद्दीत असणे गरजेचे आहे.
- वयोमर्यादा:
- सामान्य वर्ग: 18 ते 35 वर्षे
- राखीव प्रवर्ग (अजा, ज, व, घटसंकल्पीत): कमाल वय 40 वर्षे
- कुटुंब प्रमाणपत्र: “लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र” शासन नियमांनुसार अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
- प्राधान्य:
- विधवा, परित्यक्ता, अनाथ, अपंग महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाईल.
- अनुभव: पूर्वी अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका म्हणून काम केलेल्या उमेदवारांना अधिक गुण मिळतील.
- भाषा कौशल्य: स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, विशेषतः त्या भागात वापरल्या जाणाऱ्या भाषेचे.
- मूल्यमापन प्रक्रिया: सर्व अर्ज गुणांच्या आधारे तपासले जातील आणि त्यानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज केवळ संबंधित अंगणवाडी केंद्रासाठीच ग्राह्य धरले जातील.
- एकाहून अधिक अर्ज केल्यास ते अमान्य केले जातील.
- आवश्यक अटींचे पालन न झाल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- सर्व आवश्यक दस्तऐवजांची प्रमाणित छायाप्रती अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
- अंतिम निवड प्रक्रियेचा निर्णय बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा अंतिम आणि बाध्यकारी असेल.