Old Pension Yojana 2025 : ०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या प्राचार्य व अधिव्याख्याता (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत.
दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच त्याकरिता अवलंबायची कार्यपध्दती संदर्भ क्र.२ येथील शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदर निर्णयानुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) व महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा), गट ब या संवर्गातील दि.०१/११/२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात आलेल्या तथापि दि.०१/११/२००५ रोजी वा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या प्राचार्य आणि अधिव्याख्याता यांचे जूनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबतचे अर्ज/विकल्प शासनास प्राप्त झाले आहेत.
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जाहिरात क्र.५. दि. २०.०२.२००३ अन्वये, प्राचार्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जाहिरात क्र. १,
१५(३)/(१)/२०१६/वहा, दि. ०८.०४.२००४ अन्वये अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या पदाच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर जाहिरातीस अनुसरुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार पात्र उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागात प्राचार्य, गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) व अधिव्याख्याता, गट-ब (शिक्षण सक्षमीकरण शाखा), या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
३. सबब, उपरोक्त परिच्छेदात नमूद जाहिरातीस अनुसरुन नियुक्ती देण्यात आलेल्या प्राचार्य आणि अधिव्याख्याता यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०२४ मधील तरतूदी पुर्ण करित असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत :-
शासन आदेश :शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील प्राचार्य व महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा), गट-ब या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या संदर्भाधिन दिनांक ०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी पुर्ण करीत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील प्राचार्य या पदावर नियुक्ती दिलेले अधिकारी.