खुश खबर : श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना: मुलींच्या नावे 10,000 रुपयांची मंजुरी

shri siddhivinayak bhagyalakshmi yojana 2025 : श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाने “श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 रुपयांचे निश्चित मुदतठेवी (Fixed Deposit) स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर जमा करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेस न्यासाच्या व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली असून, शासनाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर या योजनेसाठीचे अटी व निकष जाहीर केले जातील, अशी माहिती न्यासाने दिली आहे.

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारही स्त्री सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. “माझी कन्या भाग्यश्री योजना” अंतर्गत पहिल्या मुलीच्या जन्मासाठी पालकांना 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच, “लेक लाडकी योजना” अंतर्गत मुलीला 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत 75,000 रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते.

श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास सामाजिक उपक्रमांतही सक्रिय असून, न्यासाच्या उत्पन्नातून गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक वितरण, तसेच डायलेसिस सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येतात.

न्यासाचे वार्षिक उत्पन्न आणि अर्थसंकल्प

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च 2025 रोजी अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक व वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. सन 2024-25 मध्ये न्यासाचे उत्पन्न 133 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, जे मूळ अपेक्षित उत्पन्न 114 कोटींपेक्षा सुमारे 15% अधिक होते.

सन 2025-26 या पुढील आर्थिक वर्षासाठी न्यासाने 154 कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. याच बैठकीत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी जन्मलेल्या नवजात बालिकांसाठी “श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आणि तो शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणाला आणि समाजातील सकारात्मक बदलाला चालना मिळेल, असा विश्वास न्यासाच्या विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment