SSC Exam 2025 Result Date : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल

SSC Exam Result date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) परीक्षांचे पेपर तपासणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यावर्षीच्या दहावीच्या परीक्षांचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच १५ मेपूर्वी जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यंदाचा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल ठरण्याची शक्यता आहे.

एसएससी परीक्षा यावर्षी २१ फेब्रुवारीपासून सुरु होऊन मार्चमध्ये संपली होती. निकालाची तयारी वेगाने सुरू असून, निकाल लवकर लागल्यास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळू शकेल.

राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. तसेच काही शाळा व महाविद्यालयांमध्ये इनहाऊस अ‍ॅडमिशनही सुरू असतात. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक सध्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. निकाल लवकर लागल्यास प्रवेश अर्ज, आवश्यक कागदपत्रांची तयारी, आणि अभ्यासक्रम निवड या बाबतीत विद्यार्थ्यांना नियोजनपूर्वक कृती करता येईल.

यंदा परीक्षेचे आयोजन वेळेआधी करण्यात आले होते, त्याचप्रमाणे निकालही वेळेत जाहीर करण्याचा मानस मंडळाचा आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात विलंब न होता प्रवेश घेऊ शकतील.

दरम्यान, परीक्षा दरम्यान काही शाळांमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण विभागाने अशा दोन शाळांची मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment